आसू :- फलटण आसू रस्त्यावर असणाऱ्या अनुराग गार्डनच्या रूममध्ये बेकायदेशीर दारूची विक्री केल्याप्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी दिलेल्या आदेशानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेख यांनी इतर पोलीस कर्मचारी यांच्यासमवेत साठे गावच्या एस . टी , स्टँड समोर जावुन दोन पंचांना बोलावून घेवुन दारू विक्री च्या बाबत करावयाच्या कारवाईची माहिती समजावुन सांगुन तुम्ही पंच म्हणुन चला सांगितले यानंतर पोलीस स्टाफ व पंच असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणी रात्री ९ :५५ वाजण्याच्या सुमारास गेले व त्याठिकाणी छापा टाकला असता तेथे अशोक किसन थोरात हा हॉटेल अनुरागचे पाठीमागील रुममधुन विदेशी दारुची विक्री करीत होता. त्याला पो . उप . निरीक्षक शेख व . पो . ना . काशीद यांनी जागीच पकडले यानंतर त्याचे हॉटेल अनुरागचे पाठीमागील रुममधील मालाची पंचा समक्ष पहाणी केली असता एका खाकी रंगाचे बॉक्स मध्ये विदेशी कांगारो १०००० स्ट्रॉग बियर असे लेबल असलेल्या प्रत्येकी ३३० मिलीचे एकुण ३७ बॉक्स यात ७५४८० रुपये किमतीचा दारू संशयित आरोपी अशोक किसन थोरात रा साठे ता . फलटण यांच्या ताब्यात मिळुन आली. पो . उप . निरीक्षक शेख यांनी जागीच दोन पंचा समक्ष पंचनामा करुन मुद्देमालास पंचाचे सहयाची कागदी लेबले लावुन जागीच सिल करुन जप्त केली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विक्रम एकनाथ कुंभार यांनी फिर्याद दिल्याने संशयित आरोपी अशोक किसन थोरात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.