फलटण नगर परिषदेने करोन संसर्ग या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये या पार्श्वभूमीवर संपूर्ण फलटण शहरात हाऊस टू हाऊस सर्व्हेक्षण चालू केले आहे.
मात्र सर्व्हे करणाऱ्याच्या व प्रशासनाच्या असे लक्षात येते आहे, की घरातील काही व्यक्ती पुणे,मुंबई, अथवा बाहेरून आलेल्या आपल्या घरातील व्यक्तीची खरी माहिती देत नाहीत.
तर अशी माहिती देण्यास काहीच हरकत नाही. याउलट माहिती लपविल्यामुळे कदाचित आपल्या घरातील लहान व वयस्कर नातलगांना व शेजारील कुटूंबाला यापासून धोका उदभवू शकतो.
तरी योग्य व खरी माहिती नगर परिषद प्रशासनाला देऊन सहकार्य करावे असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले आहे.
पुढे प्रसाद काटकर यांनी म्हटले आहे आपल्या शेजारी जर कोण बाहेरून आलेले असेल तरी त्यांनी सुध्दा ही माहिती दिली तरी त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे जाहीर केले आहे.