फलटण: पूर्ण देशावर कोरोना व्हायरस या रोगाचे आसमानी संकट आले असुन या रोगावर नियंञण आणण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झाली.अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत मंगळवार पेठेतील प्रभाग क्र.२ चे कार्यक्षम नगरसेवक मा.सनी अहिवळे यांनी एक हात मदतीचा या उद्देशाने गरजुंना जीवनावश्यक वस्तु देऊन आधार देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. म्हणुन सर्व स्तरातुन त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे