फलटण, दि. 30 : खेळामध्ये खेळाडू देश व जागतिक पातळीवर यश संपादन करताना त्याच मागे आईवडील यांचे अशिर्वाद व शिक्षक, मार्गदशर्र्क कोच यांचे श्रम असतात. खेळाडूंनी आपल्या खेळाबरोबर अभ्यासाला महत्त्व द्यावे असे प्रतिपादन अर्जुनवीर पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय,फलटण येथील दोन्ही महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन कुस्ती, वेट लिफ्टींग व शरीरसौष्ठव क्रीडा स्पर्धेा उद्घाटनप्रसंगी पै. काकासाहेब पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी नियामक मंडळाचे सदस्य आर.व्ही. निंबाळकर होते. यावेळी राष्ट्रकुल स्पर्धा सुवर्णपदक विजेते पै. राहुल आवारे, राहुरी कृषी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान, विद्यापीठ क्रीडा अधिकारी प्रा. डी.एम.गायकवाड, नियामक मंडळ सदस्य शिवाजीराव घोरपडे, शरदराव रणवरे, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधिक्षक श्रीमंत फडतरे, छत्रपती पुरस्कार विजेते सुनिल लिमण, ज्ञानेश्वर गोसावी, प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर उपस्थित होते.
कै. पै. खाशाबा जाधव यांचेनंतर राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविण्याचे भाग्य मला लाभले. शिक्षक घेत असताना शालेय राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळाल्यावर, गावातील ग्रामस्थ यांनी केलेला भव्य सत्कार अजूनही डोळ्यापुढे येतो आहे. कुस्तीमध्ये अपयश आले तरी पडण्यासाठी उभे रहा ना उमेद होवू नका. निवडलेल्या क्षेत्रात मन लावून जिद्दीनशे कष्ट करा त्याचबरोबर शिस्त ही महत्त्वाची असल्याचीजाणीव ठेवा असे आवाहन पै. राहुल आवारे यांनी केले.
भूतकाळातील आठवणींना उजाळा देवून आपण आपल्या लहानपणापासून खेळामधील जीव ओतून कष्ट करावे. आज खेळातील दिग्गज समारंभास उपस्थित असल्याने समाधान वाटले. खेळाडूंनी खिलाडूवृत्ती बाळगावी असे मत राहुरी कृषी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान यांनी व्यक केले.
कार्यक्रमास कुस्ती क्षेत्रातील सुनिल शेरे (भोर), गणेश घुले (पुणे), धुळे, पुणे, कोल्हापूर, राहुरी, सांगली येथील कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, खेळाडू कोच, प्रा. मारकर, प्रा. मोरे, प्रा.माने, क्रिडाधिकारी प्रा. पी.डी. शेडके उपस्थित होते.
सुत्रसंचालन तेजस कुंजीर व कु. वैष्णवी पिसाळ यांनी केले. प्रास्तविक प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर यांनी करुन शेवटी आभार मानले