लायन्स क्वेस्ट जागतिक पातळीवरील शैक्षणिक उपक्रम शिक्षक व विद्यार्थी यांचा भक्कम पाया : फ. ए. सोसायटीचे सरव्यवस्थापक अरविंद निकम

फलटण: दि. ३१ : लायन्स क्वेस्ट हा सामाजिक आणि भावनिक शिक्षण पध्दतीवर आधारित शैक्षणिक उपक्रम असून तो जगातील ९० देशात समर्थपणे राबविण्यात येत असून लायन्स क्वेस्ट उपक्रम सामाजिक भावनिक शिक्षण कौसल्याचा भक्कम पाया असल्याचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे सरव्यवस्थापक प्राचार्य अरविंद निकम यांनी सांगितले. 
लायन्स क्लब फलटण यांच्यावतीने मुधोजी हायस्कूल चित्रकला हाल येथे शिक्षक व विद्यार्थी लायन्स क्वेस्ट २ दिवशी कार्यशाळा ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे पहिल्या सत्राचे उदघाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सरव्यवस्थापक प्राचार्य अरविंद निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिजन २ चे झोन चेअरमन ला. अनिल कदम, रिजन चेअरमन ला. जितेंद्र निकम, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ३२३४ डीआय ला. जितेंद्र दोशी, डिस्ट्रिक्ट चेअरमन लायन्स क्वेस्ट ला. सुहास निकम, सिनीयर टेनर लायन्स क्वेस्ट बी. एल. जोशी,  फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हनिंग कौन्सिल सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. अर्जुन घाडगे, उपाध्यक्ष तुषार गायकवाड, सचिव ला. योगेश प्रभुणे, टेझरर ला. प्रमोद जगताप, माजी अध्यक्ष ला. चंद्रकांत कदम, ला. बाळासाहेब यादव, ला. मंगेशशेठ दोशी, माळजाई मंदिर उद्यान कमिटी ट्रस्ट चेअरमन ला. प्रतापसिंह निंबाळकर,  ला. विजयकुमार लोंढे पाटील, लायनेस अध्यक्षा सौ. सुनिता कदम, सेक्रेटरी सौ. निलम लोंढे पाटील, लायनेस टेझरर अर्चना बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लायन्स क्वेस्टमध्ये विद्यार्थ्यांना इयत्ता ५ वीतील  बालवय व कौशल्य, माध्यमिक ६ वी ते ८ वीतील विद्यार्थ्यांना उमलते वय कौशल्य आणि शाळाबाह्य कार्यक्रम असल्याने तो उपयुक्त आहे. लायन्स क्वेस्ट उपक्रम सामाजिक व भावनिक शिक्षण पध्दतीने २१ व्या शतकाकडे वाटचाल करणे सोईस्कर होणार असल्याचे प्राचार्य निकम यांनी स्पष्ट केले.
लायन्स क्वेस्टमध्ये सकारात्मक शाळेबरोबर दमदाटीचा, चारित्र्य, वतन, बांधिलकी प्रकार, संवर्धन सेवा शिक्षण व व्यसनाबद्दल जागरुकता आणणेचा उपक्रम असल्याने तो शिक्षक व विद्यार्थी यांना उपयुक्त असल्याचे रिजन २ चे झोन चेअरमन ला. अनिल कदम यांनी सांगितले. 
लायन्स क्वेस्टमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी ४५ मिनिटे तासिका, गहकाय / सल्ला तासिका, स्वतंत्र अभ्यासिका, मादक पदार्थ, दारु व तंबाखू प्रतिबंधक शिक्षण पध्दती शिकविली जाणार असल्याचे रिजन २  चे चेअरमन ला. जितेंद्र निकम यांनी सांगितले. 
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन दोन दिवशी लायन्स क्वेस्ट उपक्रम कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. 
लायन्स क्वेस्ट उपक्रम सवकष माहिती तयारीकरीता दोन दिवशीय कार्यशाळेत उच्च शिक्षित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांद्वारे मार्गदर्शन करणेत येणार असल्याचे लायन्स क्लब अध्यक्ष ला. अजुन घाडगे यांनी प्रास्ताविकमध्ये स्पष्ट केले. 
लायन्स क्लब संचलित मुधोजी नेत्र आय र्रग्णालय येथील रुग्णांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. 
कार्यक्रमास मुधोजी हायस्कूलमधील शिक्षक विद्यार्थी व लायन्स् क्लब पदाधिकारी उपस्थित होते. 
शेवटी ला. सचिव योगेश प्रभुणे यांनी आभार मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!