फलटण : श्रीराम जवाहर शेतकरी साखर कारखाना आगामी हंगामात पाच लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण करणार आहे. इतर कारखान्याच्या बरोबरीने चांगला दर देण्याचा प्रयत्न करणार आहे. अडचणीतून बाहेर निघणाऱ्या श्रीरामला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन महाराष्ट्र विधानपरिषद सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी केले. श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग यांच्या तेराव्या गाळप हंगामाची त्यांच्या शुभहस्ते सुरुवात कारखाना स्थळी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांनी भूषविले.
इथेनॉल प्रकल्प हा एकमेव नफ्यात चालणारा उद्योग आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान वापरुन त्याची आपल्याला सुरुवात केली पाहिजे. यंदा पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. उसाची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. बरड परिसरात कुरवली बु.येथे खासगी जागेवर परंतु सहकारी तत्वावर साखर कारखाना उभाणार आहे. त्या संदर्भातील अडचणी दूर झाल्या आहेत. तालुक्यातील चार साखर कारखान्यांमुळे शेतकऱ्यांना ऊसासाठी दुसरीकडे जावे लागणार नाही. कारखाना चांगला चालला तरच तुम्ही जगाल असे ही ते म्हणाले.
आमच्या आजोबांनी म्हणजेच श्रीमंत मालोजीराजांनी हा कारखाना १९५७ साली सुरु केला, मात्र २००२ साली आर्थिक अडचणीत आलेला हा कारखाना कोणताही राजकीय विचार न करता भाडेपट्ट्यावर चालविण्यास दिला. अशा वेळी जवाहर साखर कारखान्याचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते मा.खा.कल्लापा आवाडे (दादा), मा.मंत्री मा.श्री.प्रकाश आवाडे (आण्णा) यांच्या सहकार्याने हा भागीदारीत कारखाना चालवून कर्जमुक्त करण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेला आहे. गतवर्षी एफआरपी + ४०० रुपये प्रति टन जास्त दर या कारखान्याने दिलेला आहे. गतवर्षी कारखान्याची एफआरपी २२५९ रुपये इतकी आहे. त्यापेक्षा ३८२ रुपये जास्त देण्यात आलेले आहेत. यावेळीही चांगला दर मिळेल असे श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस घालण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी हक्काने केले.
प्रास्ताविक श्रीराम कारखान्याचे चेअरमन मा.डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी केले. त्यांनी शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस घालावा असे आवाहन केले. यंदा ८०२६ हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब, तसेच जवाहर कारखान्याचे मा.श्री.आप्पासाहेब गोटखिंडे, श्रीराम कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री.नितीन शाहूराजे भोसले, पंचायत समिती, फलटण सभापती मा.सौ.प्रतिभाताई धुमाळ, मा.चेअरमन मा.श्री.महादेवराव पवार (आबा), मा.सभापती मा.सौ.रेश्माताई भोसले, उपसभापती मा.श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, फलटण ता.दूध पुरवठा संघ चेअरमन मा.श्री.धनंजय पवार, प्रोजेक्ट मॅनेजर मा.श्री.मानसिंगराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मा.श्री.मिलिंद नेवसे (आप्पा), कारखान्याचे संचालक, संचालिका, मॅनेजिंग डायरेक्टर, सेक्रेटरी, विविध संस्था पदाधिकारी, अधिकारी, ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, कामगार, पत्रकार बंधू इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम कारखान्याचे संचालक मा.श्री.संतोष खटके यांनी केले. राजे ग्रुप, फलटण.