प्रतिनीधी (आसू ) : माण तालुका म्हटल की आपल्याला आठवतो दुष्काळ परंतु माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी एकत्रित येवून शिक्षक प्रतिष्ठाण स्थापन करूण फलटण तालुक्यातील मुकबधिर विदयालयातील विद्यार्थी यांना सहा पोती धान्य देवून मुकबधिर विदयालयाला दिला माण च्या शिक्षकांनी दिला मदतीचा हात
फलटण तालुक्यातील ठाकुरकी येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित मुकबधिर विदयालय येथील शाळेला माण च्या शिक्षक प्रतिष्ठाण ने धान्य वाटप केले या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब चोरमले जाधववाडी चे केंद्र प्रमुख दारासिंग निकाळजे आदर्श शिक्षक रविंद्र परमाळे प्रतिष्ठाण चे अध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे प्रशांत जगताप सय्यद शेख भिमराव बनसोडे शैलेंद्र साळुंखे संतोष लंभाते हरिदास पवार संतोष करणे अरविंद आढाव मोहसिन महात कल्याण भागवत शंकर देवकर प्रकाश चवरे नितीन मुळीक आदि मान्यवर उपस्थित होते
शिक्षक हे विदयादानाचे पवित्र काम करतात पंरतु शिक्षक प्रतिष्ठाण स्थापन करूण माण तालुक्यातील शिक्षकांनी एकत्रित येवून जिल्हयात एक आदर्श निर्माण केला मुकबधिर विदयालयाला केलेली मदत हि श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन दादासाहेब चोरमले यांनी केले
समाजातील वंचित व गरिब व गरजू लोकांना मदतीचा हात देणार असुन त्यासाठी शिक्षक प्रतिष्ठाण स्थापन करूण हे काम आम्ही अविरतपणे सुरूच ठेवणार आहे मुकबधिर विदयालयाचे उपक्रम हस्ताक्षर शिस्त ज्ञानरचनावादी वातावरण यामुळे मुकबधिर मुलेही यशाचे शिखर सहज पार करतील असे प्रतिपादन शिक्षक प्रतिष्ठान चे अध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी केले
या कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्या शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व मुकबधिर विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश घोरपडे यांनी तर आभार अनिल घाडगे यांनी मानले