मुधोजी हायस्कूल मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध रंगारंग कार्यक्रमानी उत्साहात संपन्न!

Screenshot

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.२७ जानेवारी २०२६) :-

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व दिमाखात आणि रंगारंग कार्यक्रमात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेच्या माजी गुणवंत विद्यार्थी फलटण येथील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ मा प्रसाद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्रीमंत मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन व ध्वजवंदना फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री अशोक जीवराज दोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी ट्रेझरर हेमंत वसंत रानडे, सदस्य शिरीष शरदकुमार दोशी, सदस्य नितीन शांतीलाल गांधी, सदस्य शिरीष हंबीरराव भोंसले , रणजित निंबाळकर ,क्रीडा समिती अध्यक्ष शिवाजीराव बाबूराव घोरपडे, सदस्य चंद्रकांत पाटील तपासणी अधिकारी दिलीप सित्तप्पा राजगुडा,सहायक तपासणी अधिकारी सुधीर अहिवले, प्राचार्य वसंत कृष्ण शेडगे , उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य सोमनाथ माने ,माध्यमिक चे उपप्राचार्य आर बी निंबाळकर ,आर एस नाळे, पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वरील मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य वसंत शेडगे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत, संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले, वरील गीत व वाचन सौ. वनिता लोणकर,सौ एल यु बुचडे व प्रशालेच्या विद्यार्थिनी आर्या साळुंखे यांनी सादर केले त्यांना तबला व पेटी वाद्याची साथ अनंत नेरकर व विद्यार्थी भांबुरे यांनी दिली,एन सी सी कमांडर तथा प्रशाला एन सी सी विभाग प्रमुख श्री दीपक पवार ( डि जे) यांच्या मार्गदर्शनात एन सी सी विभागातील साई तांबे,शिवेंद्र कदम,श्रवण कदम ,कु मृणमयी घोरपडे या कॅडेटकडून मान्यवरांना रिपोर्टिंग व संचलन करून झेंड्यास मानवंदना देण्यात आली.

तसेच यावेळी माजी गुणवंत विद्यार्थी व खेळाडू यांचे सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले यामध्ये माजी गुणवंत विद्यार्थी प्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ मा प्रसाद जोशी यांना सन्मानचिन्ह व शाल ,श्रीफळ देवून गौरविण्यात आले तसेच ५ वी ६ वी ७ वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या व ११ वि १२ वी च्या कला वाणिज्य, विज्ञान शाखेमधे प्रथम क्रमांक प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवविण्या आले तसेच कला व क्रीडा क्षेत्रात हॉकी , क्रिकेट, टेबल टेनिस ज्यूदो- कराटे, सॉफ्ट टेनिस, व्हॉलिबॉल, किक बॉक्सिंग,शासकीय चित्रकला इंटरमिजेट/इलिमेट्री ग्रेड परीक्षा ( शासकीय रेखाकला) गुणवत्ता यादीत निवड झाल्याबद्दल कु श्रावणी अटोळे हिचे विशेष कौतुक करण्यातआले. राज्यस्तरिय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूना सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरवविण्या आले.

तसेच दरवर्षी प्रशालेतर्फे देण्यात येणाऱ्या फलटण एजुकेशन सोसायटी अंतर्गत मानाचा आदर्श शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये ८ शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले यामध्ये अमोल सपाटे, सौ शुभदा आगवणे,राजकुमार पवार, सुधाकर वाकुडकर , अभिजीत माळवदे,सौ धनश्री नाईक निंबाळकर , सौ भावना भोईटे, बंडू खुरंगे पुरस्काराचे मानकरी ठरले व त्याना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विद्यार्थी व शिक्षकांनी तयार केलेल्या विविध हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवर मंडळींकडून करण्यात आले. तसेच सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रतील विविध लोककला, ऐतिहासिक देशभक्तीपर गीतांवर प्रशालेतील विद्यार्थांनी आपले कलागुण यावेळी सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना नी झाली.फलटण एज्यूकेशन सोसायटी संचालित सरस्वती संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यानी वंदे मातरम हे गिट सादर केले .
विशेष लक्षवेधी ठरले ते योगा प्रात्यक्षिक यामध्ये कु परिणीती जाधव ,कु मृन्मय जाधव,कु संस्कृती खोपडे ,कु वेदांती पाटील यांनी सहभाग नोंदवला व महाराष्ट्राचे लोकप्रिय लेझीम नृत्य यामध्ये प्रशालेतील इयत्ता आठवी व नववी मधील एकूण १३० मुलींचा लेझीम समूह यामध्ये सहभागी झाला होता त्यांना श्री तुषार मोहिते, श्री प्रदीप भोईटे , सौ.लोकरे एस.डी., सौ.पी.सी.राजपूरे यांनी मार्गदर्शन केले.तसेच इतर विविध कार्यक्रमासाठी सौ विनिता लोणकर, कु तृप्ती शिंदे ,सौ मुक्ता शिंदे आदीनी मार्गदर्शन केले.

यावेळी पालक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लेझीम व इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनच्या कला गुणांना प्रोत्साहन व विशेष दाद दिली व त्यांचे कौतुक केले.

तसेच दरवर्षीप्रमाणे एन सी सी विभागाकडून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जिलेबी, फरसाना व केळी चे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु तृप्ती शिंदे, संजय गोफणे, सुजित जमदाडे ,संदीप पवार, यांनी केले आश्या प्रकारे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!