फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ११ ऑक्टोबर २०२६):-
कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील मुख्य बाजारात भुसार मालाची आवक चांगली असून, रविवारी जाहीर झालेल्या घाऊक बाजारभावानुसार विविध प्रकारच्या धान्य व कडधान्यांच्या दरामध्ये तेजी दिसून येत आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या लिलावातील घाऊक बाजारभाव बाजार समिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत.

रविवारी पार पडलेल्या भुसार बाजारात ज्वारीची ५२ क्विंटल आवक झाली असून, प्रतिक्विंटल ४,००० ते ८,५०० रुपये असा চंंगला दर मिळाला. बाजरीची १९१ क्विंटल आवक होऊन २,६०० ते ४,००० रुपये, तर गव्हाची २७२ क्विंटल आवक होऊन २,७८० ते ३,३५० रुपये दर नोंदवला गेला. हरभऱ्याची ६८ क्विंटल आवक होऊन ७,००० ते ७,८०० रुपये तर मक्याची २४३ क्विंटल आवक होऊन २,५७5 ते २,९५१ रुपये भाव मिळाला. खपली गव्हाची २ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ४,५२० रुपये स्थिर दर मिळाला.

याशिवाय कडधान्यांच्या बाजारात उडदाची ४५ क्विंटल आवक होऊन ९,५०० ते १०,०१० रुपये, हिरव्या मुगाची २६ क्विंटल आवक होऊन ७,५०० ते १०,००० रुपये, तर पिवळ्या मुगास प्रतिक्विंटल १५,००० रुपयांचा स्थिर व उच्चांकी दर मिळाला. घेवड्याची ३५ क्विंटल आवक नोंदवली गेली असून त्यास ६,१०० ते १०,३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. भुसार मालाच्या दरातील या तेजीमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

