
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ०८ मार्च २०२६ ) :- फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेतील एकुण १६५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसले होते त्यातील शाळेचे ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती विभागाचे प्रमुख श्री आर एम पवार , मार्गदर्शक शिक्षक एस एस मठपती, श्री एम ए नेरकर ,सौ पी सी राजपूर, सौ पी व्ही मुळे यांच्यासह सर्व विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे, विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान सदस्य मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य ,प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम,ज्युनिअर कॉलेज तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा माध्यमिक तपासणी अधिकारी श्री सुधीर अहिवळे मुख्याध्यापक श्री वसंतराव शेडगे,ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने, माध्यमिकचे उपप्राचार्य श्री ए वाय ननावरे माध्यमिकचे पर्यवेक्षक आर एस नाळे, अर बी निंबाळकर व पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

ok

