सी .आय .ओ टुडे या आंतरराष्ट्रीय मासिकात बारामती च्या जितेंद्र जाधव यांच्या कार्याची दखल


जितेंद्र जाधव

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १३ नोव्हेंबर २०२६):-
बारामती येथील श्रायबर डायनॅमिक्स कंपनीचे मा. ऑपरेशन डायरेक्टर व सद्या पुणे येथील एच. आर. एस. प्रोसेसिंग सिस्टिम या आंतरराष्ट्रीय कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री जितेंद्र जाधव यांच्या औद्योगिक क्षेत्रातील काम व अनुभवाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील सी. आय. ओ. टुडे या मासिकात घेण्यात आली आहे.


सदर मासिक आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना वरिष्ठ पदावर काम करताना कंपनी व्यवस्थापन यांनी दिलेल्या जवाबदारी , कामगार वेतन करार, कामगार संघटना व प्रशासन यांच्यातील संबंध,कंपनी वाढीसाठी केलेले प्रयत्न, नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान चा कंपनी मध्ये केलेला वापर आदी बाबीच्या आधारे वर्षभरातील कार्याचा अभ्यास करून पुढील पिढीसाठी मार्गदर्शक लेख व्हावा या उदेश्याने विविध कार्पोरेट कंपनी मधील ५० उच्च अधिकारी यांचा सदर मासिकात उल्लेख करते सन २०२५ व २०२६ या एक वर्षाचा कार्याचा अभ्यास करून जितेंद्र जाधव यांच्या कार्याचा गौरव सदर मासिकात फोटो व लेख प्रकाशित करून सन्मान करण्यात आला आहे.
जितेंद्र जाधव यांचे शिक्षण बी ई (इलेक्ट्रॉनिक्स) ,एम. सी. पी. एम. व डी. बी. एम व केंब्रिज विद्यापीठाकडून शाश्वत विकासातील नेतृत्वाचे शिक्षण या विषयावर पदवी घेतली आहे ,


सिमेन्स इंडिया लिमिटेड , श्रायबर डायनॅमिक्स, व इतर नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनी बरोबर काम करत २ हजार कोटीचे प्रोजेक्ट असलेल्या कंपनी बरोबर त्यांनी काम केले आहे भारतातील नामांकित कंपनीतील ” मुख्य कार्यकारी अधिकारी” म्हणून सुद्धा या पूर्वी गौरविण्यात आले आहे.
एकूण 30 वर्षाच्या कालावधीत औद्योगिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत


” भारतातील कार्पोरेट क्षेत्रात बारामती चे जितेंद्र जाधव यांची सदर मासिकात दखल घेतली जाते हे बारामती करा साठी अभिमास्पद बाब आहे त्याच्या कार्यबदल मनःपूर्वक शुभेच्छा व यानंतर सुद्धा त्यांच्या हातून औद्योगिक क्षेत्रातील उत्तम कार्य घडत राहो” अशी प्रतिक्रिया बारामती नगरपरिषद चे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले
त्यांच्या सदर यश बदल बारामती एमआयडीसी मधील विविध उद्योजक व बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि विविध कामगार संघटना यांनी अभिनंदन केले आहे

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!