फलटण बाजार समितीमध्ये हरभरा, तूर हमीभाव खरेदी सुरु

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. ९ मार्च २०२६): -कृषि उत्पन्न बाजार समिती फलटणच्या मुख्य बाजार आवारात, नाफेड व तालुका खरेदी विक्री संघ यांच्या माध्यमातून हरभरा,तूर हमीभाव खरेदी केंद्र नुकतेच सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हरभरा या शेतमालासाठी प्रतिक्विंटल 5875 आणि तुरीसाठी प्रतिक्विंटल 8000 रुपये हमीभावाने खरेदी करण्यात येणार असल्याचे समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
नाफेड मार्फत हंगाम 2025- 26 मध्ये हरभरा, तूर खरेदीसाठी नाव नोंदणी सुरु झाली असून तूर खरेदीसाठी दि.24 मार्च 2026 आणि हरभरा खरेदीसाठी दि.31 मार्च 2026 अखेर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Screenshot


ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ऑनलाइन नोंदणी केली नाही, त्यांनी मुदतीत नाव नोंदणी करावी असे आवाहन बाजार समितीचे व्हा.चेअरमन श्री. भगवानराव होळकर यांनी केले आहे.
बाजारामध्ये हरभरा, तूर शेतमालाचे भाव पडल्याने फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले असून याकरिता सब एजंट म्हणून फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवड करण्यात आली आहे.
हरभरा या शेतमालाचा हमीभाव 5875 आणि तूर या शेतमालाचा हमीभाव 8000 रुपये प्रति क्विंटल असून, कमाल आर्द्रता 12 टक्के आवश्यक आहे.


सन 2025-26 च्या हंगामात 7/12 वर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. आधार कार्ड झेरॉक्स, डिजिटल अथवा स्वाक्षरीतील 7/12, खाते उतारा, बँक खाते झेरॉक्स इ. कागदपत्रे घेऊन मुख्य कार्यालय, मार्केट यार्ड, फलटण येथे नोंदणी करणेत यावी.
ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे शेतमाल आणण्याची तारीख कळविण्यात येणार आहे, त्याचदिवशी खरेदी केंद्रावर माल आणावा असे आवाहन समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले.
हमीभाव खरेदी बाबत अधिक माहितीसाठी फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक श्री.विठ्ठल जाधव मो.नं 7972417546 व समितीचे ग्रेडर श्री.के.पी.सस्ते मो.नं.9890456824 यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

                          सचिव
               कृषि उत्पन्न बाजार समिती 
                   फलटण जि.सातारा
Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!