
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २८ मार्च २०२६):- फलटण शहर व परिसराची तसेच तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महत्वाच्या बंदोबस्तावेळी कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलिस प्रशासनाचे महत्वाचे कर्तव्य असते अशा वेळी महत्वाच्या बंदोबस्तासाठी फलटण शहर पोलीस ठाणे व उपविभागाकरिता मा. श्री तुषार दोशी, पोलीस अधीक्षक साो, सातारा यांचे मान्यतेने एक SURVEILLANCE VAN वाहन देण्यात आली आहे.
सदर पोलीस वाहनाच्या चारी बाजुस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून चारी बाजुस सर्च लाईट बसविण्यात आल्या आहेत. तसेच व्हॅनमध्ये स्क्रीन असून सदरचे कॅमरे स्क्रीनला जोडण्यात आले आहेत. त्यामध्ये चारी बाजुचा पूर्ण परिसर कव्हर करणेत आला आहे. सदर पोलीस व्हॅनमध्ये उपचाराकामी प्राथमिक उपचारपेटी, स्ट्रेचर असून पिण्यासाठी पाण्याचा जार, आग विझविण्यासाठी फायर एक्सटेन्शन, तसेच अलाऊसिंगसाठी पी.ए. सिस्टीम बसविण्यात आली आहे. अशा सर्व सोईसुविधांनी सुसज्ज अशी पोलीस सर्व्हिलन्स व्हॅन फलटण शहर पोलीस ठाणेस दाखल झाली असून सदर वाहनाचा उपयोग पोलीसांना महत्वाच्या बंदाबस्तावेळी होणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी अत्यंत उपयोगी पडणार आहे. गर्दीच्या ठिकाणी लोकांना सुचना देण्यासाठी सदर गाडीवर P.A. सिस्टीम चा चांगल्याप्रकारे उपयोग होणार आहे. आज दि.२५/०३/२०२६ रोजी मोटार परिवहन विभाग सातारा यांचेकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदर वाहन हाताळण्याचे प्रशिक्षण पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले आहे.
सदरचे अत्याधुनिक सर्व्हिलन्स व्हॅन फलटण पोलीस उपविभाकरिता दिल्याने सर्व अधिकारी व अंमलदार यांनी मा. श्री. तुषार दोशी. पोलीस अधीक्षक सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे सर यांचे आभार मानले आहे.

