“प्राईड ऑफ सीएसीपीई “ पुरस्काराने मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. तायाप्पा मारुती शेंडगे सन्मानित


मान्यवर डॉ. मिलिंद नाईक व श्रीमती नेहा दामले यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा. तायप्पा शेंडगे, प्राचार्य सोपान कांगणे , श्री.तुषारभैय्या नाईक निंबाळकर , प्रा. महेश देशपांडे व इतर मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा ( पुणे, दि. ३१ मार्च २०२६):- चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालया चे माजी विद्यार्थी तथा मुधोजी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. तायाप्पा मारुती शेंडगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान आणि कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना प्रतिष्ठेचा “प्राईड ऑफ सीएसीपीई “ ( ‘Pride of CACPE’ ) पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी ज्ञान प्रबोधनी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते , तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रीय मंडळाच्या शिक्षण संचालिका श्रीमती नेहा दामले , प्राचार्य सोपान कांगणे ,शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त तथा चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. माधव सर, युवा उद्योजक श्री. तुषारभैय्या नाईक निंबाळकर , फलटण टुडे चे संपादक श्री.अमोल नाळे ,प्रा महेश देशपांडे,प्रा शरद आहेर, प्रा अमित प्रभू ,डॉ. शिरीष मोरे ,प्रा श्रद्धा नाईक, प्रा. उज्ज्वला राजे , माजी विद्यार्थी सचिन नाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी विद्यार्थ्यानी स्वागत गीत सादर केले.तर पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य सोपान कांगणे यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाचा वर्षीक अहवाल सादर केला.पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रद्धा नाईक यांनी केला तर अध्यक्षांचा परिचय प्रा. शरद आहेर यांनी केला. यावेळी पुरस्कारार्थी मान्यवरांचे गौरवपत्राचे वाचन प्रा उज्ज्वला राजे यांनी केले.

यावेळी चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालया चे सन २०१३ सालचे माजी विद्यार्थी प्रा. तायाप्पा मारुती शेंडगे याना डॉ. मिलिंद नाईक ,श्रीमती नेहा दामले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Screenshot

यावेळी पुरस्कारार्थी प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले मी सन २०१३ साली या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मला ज्या महाविद्यालयाने व प्राध्यापकानी घडवले व त्यांनी माझ्या अंगी जे संस्कार , शिक्षण,शिस्त माझ्यात रुजवले याचा मला माझ्या जीवनात फायदा झाला व त्या मुळे मी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विविध आंदोलने करून जो लढा उभारला व तो यशस्वी केला. त्याचे श्रेय महाविद्यालय आणि प्राध्यापकांना जाते कारण माझ्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे .ज्या महाविद्यालयात शिकलो तेथे पुरस्कार मिळणे हे माझे भाग्यच आहे . तसेच माझ्या जीवनात आमच्या फलटण एज्युकेशन सोसायटी चे सचिव मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा कायम खंबीर पाठिंबा असल्याने मी कोणत्याही परिस्थितीत मागे न हटता माझ्या आंदोलनात काम करत राहिलो व आज त्या लढ्यामुळे अनेक भावी क्रीडा शिक्षक यांना नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. आज मी इथे उभा आहे. ते माझे मार्गदर्शक मा. श्री. तुषार भैय्या नाईक निंबाळकर यांच्या पाठिंब्याने व योग्य मार्गदर्शनने असे त्यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.मिलिंद नाईक म्हणाले की जो पुरस्कार दिला गेला आहे. तो योग्य माणसाला दिला गेला आहे आणि तो माझ्या हस्ते देण्यात आला. याबद्दल मी आभारी आहे.

यावेळी अनेक मान्यवर मंडळी यांनी आपल्या भाषणात पुरस्कारार्थी यांचे कौतुक केले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. शरद आहेर व अमित प्रभू लिखित शारीरिक शिक्षणावर आधारित पुस्तक सूक्ष्म अध्यापन संकल्पना याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावर्षी महाविद्यालयातील विविध क्रीडा स्पर्धा यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

या कार्यक्रमस अनेक मान्यवर व विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. श्री. महेश देशपांडे यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!