मुधोजीराजे प्रज्ञाशोध परीक्षे चा प्रयोग यशस्वी ठरला याचे समाधान व कौतुक : अरविंद निकम

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि ०२ एप्रिल २०२६):- फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांच्यामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या प्रज्ञेचा शोध घेऊन त्या बुद्धिवंत विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या चौफेर कक्षा खुल्या करून देण्यासाठी आणि आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आभासी जगातील ज्ञानाचा गुणवंत विद्यार्थ्यांना लाभ करून देण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची मानसिक क्षमता विकसित करणे तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन करण्याची क्षमता विकसित करणे या विचाराने प्रभावित होऊन फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजीराजे प्रज्ञाशोध परीक्षा माध्यमिक विभाग सुरू करण्यात आली.

मुधोजीराजे प्रज्ञाशोध मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटणच्या चित्रकला दालनात गुरुवार दिनांक १२ मार्च २०२६ रोजी आयोजित केलेला होता , प्रारंभी मुधोजी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सुंदर स्वागत गीताने सुरुवात केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व देवी सरस्वती व श्रीमंत मुधोजीराजे यांच्या प्रतिमांचे पूजन संपन्न झाले.

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या इयत्ता ५ वी ते ९ वीच्या एकूण ५००० प्रविष्ट विद्यार्थ्यांमधील चॅम्पियन करंडकासह बक्षीस पात्र ठरलेल्या 76 विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे फलटण एज्यूकेशन सोसायटीचे खजिनदार व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हेमंत रानडे,. फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या नियामक मंडळ सदस्या व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे सौ नूतन शिंदे , फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या नियामक मंडळ सदस्या सौ वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या नियामक मंडळा चे सदस्य श्री डॉ पुरुषोत्तम राजवैद्य, मुधोजीराजे प्रज्ञाशोध परीक्षे चे कार्याध्यक्ष श्री दिलीप राजगुडा,मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण चे प्राचार्य श्री वसंत कृष्णा शेडगे , गुरु द्रोणा सायन्स अकॅडमीचे श्री अविनाश नरुटे या मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम , प्रशस्तीपत्र ,चषक देऊन गौरविण्यात आले .

यावेळी बोलताना फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम म्हणाले या विभागाचे हे दुसरे वर्ष असून, पालकांचे व विद्यार्थ्यांचे मिळणारा प्रतिसाद पाहता , दरवर्षी वाढती विद्यार्थी संख्या व परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणारे उज्वल यश कौतुकास्पद असून , मुधोजीराजे प्रज्ञाशोध परीक्षा हा उपक्रम राबवताना त्यांच्या यशाबद्दल खात्री होतीच. संस्थेने ना नफा या तत्त्वावर हा उपक्रम सुरू केला आणि आज मुधोजीराजे प्रज्ञाशोध परीक्षे चा प्रयोग यशस्वी ठरला याचे समाधान व कौतुक आहे. या परीक्षेची उत्तरोत्तर भरभराट व्हावी अशा शुभेच्छा दिल्या संयोजकाचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांनी मनस्वी अभिनंदन केले.

याप्रसंगी मुधोजीराजे प्रज्ञाशोध परीक्षे चे कार्याध्यक्ष श्री दिलीप राजगुडा यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै . यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त सर्व उपस्थितांच्या वतीने त्यांना अभिवादन करून थोडक्यात त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला.


तसेच यावेळी त्यांनी मुधोजीराजे प्रज्ञाशोध परीक्षेचे सर्व कार्यकारी शिक्षक मंडळ आणि मुधोजीराजे प्रज्ञाशोध परीक्षेचे प्रमुख श्री शामराव आटपाडकर या सर्वांच्या अथक प्रयत्नातून मुधोजीराजे प्रज्ञाशोध परीक्षा पुढील काळात जिल्हास्तरीय परीक्षेचे आयोजन करणार असून त्यातही आम्ही निश्चित यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व फलटण एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आमदार मा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटण, फलटण एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी चे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन, खंबीर पाठिंबा आणि प्रेरणा यामुळे मुधोजीराजे प्रज्ञाशोध परीक्षा हा उपक्रम यशस्वी आणि फलदायी ठरला आहे. असे सांगितले

Screenshot

याप्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक ,यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक , विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तृप्ती शिंदे व श्री सुजित जमदाडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक श्री मनोज कदम यांनी केले.तसेच यावेळी शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर उपस्थितांचे आभार समन्वयक श्री शैलेश कदम यांनी मानले.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!