महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या पुणे जिल्हा जिल्हाध्यक्षपदी श्री. सचिन नाळे व सचिवपदी श्री . रणजीत देवकर यांची निवड !

फलटण टुडे वृत्तसेवा (पुणे, दि १३ एप्रिल २०२६):-महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ संचलित पुणे जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये पुणे जिल्हा अध्यक्षपदी श्री.सचिन नाळे यांची तर जिल्हा सचिवपदी श्री. रणजीत देवकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण या विषयाच्या प्रगतीसाठी व शारीरिक शिक्षण शिक्षक यांचे विविध प्रश्न सोडवणूकीसाठी या महासंघाच्या माध्यमातून राज्यभर कार्यकारिणीची निवडीची प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेचा भाग म्हणून पुणे जिल्ह्याची निवड सभा नुकतीच पार पडली. सदर निवड महासंघाचे संस्थापक श्री. संदीप मनोरे, राज्य सचिव प्रा. तायाप्पा शेंडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.

Screenshot

जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे
जिल्हा अध्यक्ष म्हणून श्री. सचिन नाळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री. राकेश यादव, श्री. सुदर्शन माने , श्री. महादेव टकले. कार्याध्यक्ष पदी श्री. सोमनाथ नलवडे, सचिवपदी. श्री रणजीत देवकर,सहसचिव पदी श्री.ऋषिकेश खोमणे,श्री. अमित गावडे, श्री.अभिजीत साळुंके,खजिनदार पदी श्री. सोमनाथ कोठावळे, सह खजिनदार पदी श्री. नवनाथ गायकवाड, श्री गणेश गव्हाणे, सौ. तेजश्री शिंदे. जिल्हा संघटकपदी श्री. मंदार कळसकर श्री. मोहन कचरे श्री. अतुल जगताप श्री. साहिल बागवान श्री .अमित परब, श्री. सुरज माने,श्री. हर्षल मुळे,श्री. सचिन काशीद ,श्री. सागर पवार,श्री. लक्ष्मण गावडे, सौ. मोनाली काळे,सौ. साधना खोमणे, सौ. संगीता ढगे, सौ.ज्योती उदावंत, यांची निवड झाली आहे.

तसेच पुणे जिल्हा सदस्य श्री. सचिन सूर्यवंशी,श्री. विशाल शेंडगे, श्री. विशाल हडंबर श्री. नितीन शेटे श्री.अमोल नाळे,श्री. हर्षल मुळे, श्री. मनोज मदने, श्री. स्वप्निल बोराटे, श्री. धनंजय यादव, श्री. ऋषिकेश लोणकर, श्री. धीरज हिरवे,श्री. लक्ष्मण किसवे,श्री. प्रज्वल सावक,श्री. वैभव जगताप,श्री. आरती काळभोर, कुमारी. नीला कांबळे, सौ. संगीता तरवळ,

जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री. मनोज डोंबाळे,श्री. वैभव जगताप, श्री. युवराज देवकर श्री. वैभव ठोंबरे तर जिल्हा सह प्रसिद्धीप्रमुख श्री. अभिजीत चव्हाण, श्री. मयूर जराड यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे संचलित महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या कार्यकारणींची निवड प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा कार्यकारणी निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली.

Screenshot

सदर निवड झालेल्या नूतन कार्यकारणीचे जिल्ह्यातील शिक्षक,क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमी, विविध संस्थांचे संस्थापक व संचालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!