फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा दि ३१ मे २०२६):- सामाजिक न्याय विभागांतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी सातारा, कराड आणि पाटण येथील वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पात्रता
इयत्ता ८ वी ते १० वी मधील विद्यार्थी
कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात शिकणारे विद्यार्थी
शासन मान्यता प्राप्त शाळा/महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा
पाटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य
उत्पन्न मर्यादा
OBC / VJNT प्रवर्ग : वार्षिक उत्पन्न ₹१ लाखापर्यंत
SC / ST प्रवर्ग : वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखापर्यंत
आवश्यक कागदपत्रे
१. मागील वर्षाच्या गुणपत्रिकेची प्रत
८ वी प्रवेशासाठी ७ वीची टक्केवारी मुख्याध्यापकांच्या सही व शिक्क्यासह
२. जातीचा दाखला (प्रांताधिकारी कार्यालयाचा)
३. उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार कार्यालयाचा)
४. आधार कार्ड व बँक पासबुकची प्रत
५. डोमिसाईल दाखला (तहसीलदार कार्यालयाचा)
६. शाळा सोडल्याचा दाखला
७. सध्याच्या शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
उपलब्ध सुविधा
मोफत निवास व भोजन व्यवस्था
शासन नियमानुसार गणवेश, स्टेशनरी व निर्वाह भत्ता थेट बँक खात्यावर
सुसज्ज ग्रंथालय व वाचनालय
अभ्यासिका व संगणक कक्ष
करमणूक कक्ष
खुली व बंदिस्त व्यायामशाळा
क्रीडा साहित्य
प्रशस्त इमारत व सुरक्षित परिसर
संपर्क
फोन : ०२३७२-२८२३०७ / ७०५८९५७०३८
ऑनलाईन प्रवेश वेबसाईट
hmas.mahait.org अर्ज करता येतील.
०००००
सामाजिक न्याय विभागाच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह सातारा, कराड व पाटण येथील वसतिगृहात २०२६-२७ वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू*

