किरण बेदी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना जितेंद्र जाधव
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ३ जून २०२६):-
पुणे येथील एच.आर.एस. प्रोसेसिंग सिस्टीम या कंपनीचे वॉइस प्रेसीडेंट जितेंद्र जाधव यांना “कार्यप्रणाली व औद्योगिक धोरण २०२६ “या विषयातील उत्कृष्ट कार्यासाठी मुबंई येथील कार्यक्रमात पहिल्या महिला आयपीएस व माजी राज्यपाल किरण बेदी यांच्या शुभहस्ते
(३१ मे २०२६ ) सन्मानित करण्यात आले.

बिजनेस व्ह्यू पॉईंट अँड द एंटरप्राइजेस वर्ल्ड ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने विकसित भारत २०४७ हे उद्दिष्ट्य ठेऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल गौरवण्यात येते या वर्षी जितेंद्र जाधव यांना “उत्पादकता व नाविन्य उद्योग क्षेत्रातील नेतृत्व” आदी क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार देण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे श्री ध्रुव आपटे व सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्तीत होते.

जितेंद्र जाधव यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी प्राप्त केली असून यापूर्वी नाशिक सीमेंस व बारामती एमआयडीसी येथील श्रायबर डायनामिक्स डेअरी येथे ऑपरेशन डायरेक्टर म्हणून उत्तम व नाविन्यपूर्ण कार्य केले आहे.
ज्या संस्थेमध्ये आपण काम करत आहोत त्या संस्थेचा नावलौकिक व उत्पादन क्षमता वाढवणे व देशहितासाठी आपल्या अनुभवाचा फायदा झाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असल्याचे पुरस्कार स्वीकारल्यावर जितेंद्र जाधव यांनी सांगितले. त्याबद्दल त्यांनी कुटुंबिय व मित्रपरिवार व अधिकारी ,कर्मचारी यांचे आभार मानले


