ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

वैचारिक वारसा जपणारे प्रा.रमेश आढाव यांचा १८ जुलै रोजी स्मृतिदिन

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १५ जुलै २०२६):- सातारा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभ्यासू व्यक्तिमत्त्व दिवंगत प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० या वेळेत स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रा. रमेश आढाव यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात समाजकारण, राजकारण, शिक्षण, साहित्य आणि पत्रकारिता या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देत अनेकांना प्रेरणा दिली. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित या स्मृतिदिन कार्यक्रमात त्यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० ते ११.०० या वेळेत स्मृतिदिन संस्कार विधीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० या वेळेत विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रा.आढाव यांच्या व्यक्तिमत्त्व, कार्यकर्तृत्व आणि सामाजिक योगदानाविषयी स्मृतिपर मनोगत व्यक्त करणार आहेत.

हा स्मृतिदिन कार्यक्रम फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर येथे आयोजित करण्यात आला असून, प्रा. रमेश आढाव यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी नागरिक, सहकारी, मित्रपरिवार, पत्रकार, साहित्यप्रेमी, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!