वंजारवाडी मध्ये वृक्षारोपण करताना विनोद चौधर व मित्रपरिवार
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २३ जुलै २०२६):-
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वंजारवाडी येथे विनोद चौधर मित्रपरिवार यांच्या वतीने वृक्षारोपण चा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
बुधवार २२ जुलै रोजी वंजारवाडी चे मा उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विनोद चौधर यांच्या पुढाकारातून जास्त ऑक्सिजन देणारे, जमिनीत जास्तीत जास्त पाणी शोषुन घेण्याची क्षमता असणारे ,जास्त व घनदाट सावली देणारे,आयुष्य जास्त असणारे देशी झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी विनोद चौधर, नवनाथ चौधर, अजित चौधर, सचिन चौधर, सौरभ दराडे, बंडू खोगरे, भारत खेडकर ,संतोष दत्तू चौधर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
अजित दादा यांना अभिप्रेत असलेलं समाजकार्य व पर्यावरण5 कार्य करत असताना वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर या माध्यमातून दादांना आदरांजली वाहण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे आयोजक विनोद चौधर यांनी सांगितले.


