मुधोजी हायस्कूलमध्ये स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि२२ जुलै २०२६): –

फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्राचार्यांनी आपल्या मनोगतात स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान, सर्वसामान्य जनतेशी असलेली त्यांची बांधिलकी आणि विकासाभिमुख विचारसरणी यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची भावना अंगीकारावी. स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन राष्ट्राच्या विकासात योगदान देण्याचा संकल्प करावा, असेही प्राचार्यांनी सांगितले.

यावेळी ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर बी निंबाळकर या उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि स्मृतींना अभिवादन केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची व महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाची माहिती देण्यात आली.

Screenshot

या कार्यक्रमास मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे , शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमा चे सूत्रसंचलन सौ लतिका अनपट यांनी केले तर आभार सौ विनिता लोणकर यांनी मानले.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!