फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि २३ जुलै २०२६):- रयत शिक्षण संस्था आणि मराठा बिझनेसमन फोरम ( MBF ) , शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २४ जुलै २०२६ रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . सदर शिबिर हे MPSC/ UPSC यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णतःमोफत असणार आहे .
या शिबिरामध्ये माजी सनदी अधिकारी मा. श्री. इंद्रजीत देशमुख साहेब यांचे विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान होणार असून इतर तज्ञांचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे.

सदर शिबिर हे सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे होणार असून नाव नोंदणी व इतर माहितीसाठी ९९२२६२०७६८ या क्रमांकावर संपर्क साधावा. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले. या शिबिरातून विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन दर शनिवार आणि रविवार असे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचा मानस असल्याचे आयोजनकांतर्फे सांगण्यात आले .


