फलटण च्या वडले गावच्या आदित्य लाळगे ची भारतीय विश्वचषक हॉकी संघात निवड…

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २३ जुलै २०२६):- फलटण तालुक्यातील वडलें गावचा सुपुत्र आदित्य लाळगे ची भारतीय विश्वचषक हॉकी संघात निवड झाली असून, तो हॉकी इंडिया संघाच्या वतीने बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे होणाऱ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, आदित्यच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे अभिनंदन होत आहे.

आदित्य याची २०२२ मध्ये ज्युनिअर आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. त्यानंतर त्याने सातत्यपूर्ण मेहनत आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली. यावेळीही त्याची भारतीय संघात निवड होऊन तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Screenshot

आदित्य हा मूळचा ग्रामीण भागातील असून त्याने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे यश मिळवले आहे. त्याच्या यशामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली असून, योग्य प्रशिक्षण व संधी मिळाल्यास मोठ्या स्तरावर यश मिळवता येते, हे त्याने सिद्ध केले आहे.

त्याच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधापरिषदे चे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा आमदार दिपक चव्हाण,फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटी चे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कुटुंबीय, प्रशिक्षक, शिक्षक, ग्रामस्थ तसेच क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!