श्रीमंत संजीवराजेंच्या मागणीला परिवहन मंत्र्यांचा प्रतिसाद; फलटण आगाराला नवीन एसटी बसचे १२ ऑगस्ट रोजी लोकार्पण

प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला; ३१ ऑगस्टपूर्वी बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पूर्ण

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ११ ऑगस्ट २०२६):- पालखी पाहणी दौऱ्यादरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर फलटणचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण बसस्थानक व आगारासाठी नवीन एसटी बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यावेळी मंत्री सरनाईक यांनी ३१ ऑगस्टपूर्वी नवीन बस उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. या आश्वासनानुसार बुधवार दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी फलटण आगार येथे नवीन एसटी बसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्रीमंत संजीवराजे यांच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने फलटणच्या एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन बस उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण तसेच शहरातील प्रवाशांची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.


दरम्यान, फलटण आगारासाठी अद्याप आवश्यक असलेल्या उर्वरित नवीन बसही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असा शब्द मंत्री सरनाईक यांनी दिल्याची माहिती देण्यात आली.
फलटणकरांच्या मागणीची दखल घेऊन नवीन बस उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार व धन्यवाद मानले आहेत.
नवीन एसटी बसच्या लोकार्पण कार्यक्रमास नागरिक, प्रवासी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!