अनंत युवा प्रतिष्ठानचा यंदाचा गणेशोत्सव भक्तिमय

स्वर्गीय अजितदादांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक कार्यक्रम रद्द; नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीत १० दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ,दि १ सप्टेंबर २०२६):-
अनंत युवा प्रतिष्ठान, सूर्यनगरी, बारामती यांच्या वतीने दरवर्षी उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा अधिक भक्तिमय आणि सामाजिक भावनेने साजरा करण्यात येणार आहे. राज्याचे लाडके व कार्यक्षम उपमुख्यमंत्री स्वर्गीय श्री. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ यंदाच्या गणेशोत्सवातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून त्याऐवजी १० दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Screenshot

स्वर्गीय अजितदादांच्या कार्याला आणि पवित्र स्मृतीला अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात येणार असून, गणेशभक्तांना अध्यात्म, संस्कार, समाजप्रबोधन आणि सकारात्मक विचारांचा संदेश देण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे.

Screenshot

१० दिवसीय कीर्तन महोत्सव

📅 दिनांक : १५ सप्टेंबर २०२६ ते २४ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
📍 स्थळ : लेन नंबर ४, ओपन स्पेस, सूर्यनगरी, बारामती

🎙️ कीर्तनकारांची मांदियाळी

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत पुढील मान्यवर कीर्तनकारांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे—

  1. श्री. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर)
  2. ह. भ. प. रुपालीताई सवने (परतुरकर)
  3. ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील
  4. ह. भ. प. सोपानदादा कन्हेरकर महाराज
  5. ह. भ. प. चैतन्य महाराज वाडेकर
  6. ह. भ. प. विशाल महाराज खोले
  7. ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे
  8. ह. भ. प. शंकर महाराज शेवाळे
  9. ह. भ. प. कबीर महाराज आत्तार
  10. ह. भ. प. माणिक महाराज हरकाळ

या नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीमुळे गणेशोत्सव काळात सूर्यनगरी परिसरात भक्तिमय आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण होणार असून, नागरिक व गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनंत युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

यावर्षी अनंत युवा प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवासाठी स्वतंत्र ‘फेस्टिवल समिती’ स्थापन करण्यात आली असून, ही समिती दरवर्षी नव्याने गठित करण्यात येणार आहे. यंदाच्या समितीच्या अध्यक्षपदी चि. कृष्णकांत नाळे, उपाध्यक्षपदी चि. प्रतीक सुरवसे आणि खजिनदारपदी श्री. किरण गोरे यांची निवड करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक आणि संस्कारक्षम उपक्रमांची परंपरा कायम ठेवत यंदा स्वर्गीय अजितदादांच्या स्मरणार्थ भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प अनंत युवा प्रतिष्ठानने केला आहे.

याबाबतची माहिती श्री. प्रविण दत्तात्रय माने, संस्थापक-अध्यक्ष, अनंत युवा प्रतिष्ठान, सूर्यनगरी, बारामती तथा नगरसेवक, बारामती नगरपरिषद यांनी दिली.

चौकट

स्वर्गीय अजितदादा पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून यंदाच्या गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून १० दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या माध्यमातून गणेशोत्सव भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव ठरावा, हा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या भक्तिमय कीर्तन महोत्सवात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा.”
प्रवीण माने
संस्थापक अध्यक्ष अनंत युवा प्रतिष्ठान, व नगरसेवक बारामती नगरपरिषद बारामती

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!