फलटण टुडे वृत्तसेवा :-
श्री संत ज्ञानेश्वर पालखीचे तरडगाव येथून प्रस्थान झाले असून तरडगाव ते फलटण या महत्त्वाच्या टप्प्यातील माऊली वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग आरोग्य विभाग, सातारा जिल्हा प्रशासन यांच्या वतीने माऊलींच्या सेवेसाठी मोफत आरोग्य सेवा यासह मोफत मोबाईल चार्जिंग स्टेशन, ठिकठिकाणी आंघोळीची व पिण्याचे पाण्याची सोय सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने कर्मचारी अत्यंत चांगल्या पद्धतीने करीत आहेत.
पालखीचे आज सायंकाळी सहा वाजता फलटण शहरात आगमन होणार असून स्वागतासाठी फलटणकर सज्ज झाले आहेत.

