मा. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुधोजी हायस्कूलमध्ये ‘विज्ञान मेळावा २०२६-२७’ उत्साहात संपन्न..

२४० उपकरणांसह ३१० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १० ऑक्टोबर २०२६):-
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी (७५ व्या) वर्षाचे औचित्य साधून तसेच संस्थेचे सेक्रेटरी, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे ‘विज्ञान मेळावा २०२६-२७’ अत्यंत उत्साहात पार पडला. “विज्ञान, शोध, इनोव्हेशन आणि एक उजळ उद्या” या संकल्पनेवर आधारित आयोजित या भव्य मेळाव्यात प्रशालेतील ३१० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून तब्बल २४० विविध वैशिष्ट्यपूर्ण विज्ञान उपकरणांचे सादरीकरण केले.


या विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद सखाराम निकम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळा तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा आणि शाळा तपासणी अधिकारी सुधीर अहिवळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.


कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उद्घाटक अरविंद निकम आणि शाळा तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा यांनी विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि नवनिर्मिती क्षमतेचे कौतुक केले. आजच्या आधुनिक युगात विज्ञानाची गरज आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून आपल्या सुप्त गुणांचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले.


प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी अध्यक्षीय मनोगतात श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनाचा गौरव करत विद्यार्थ्यांच्या या वैज्ञानिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एस बी आटपाडकर यांनी केले.


याप्रसंगी मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव शेडगे, माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक विजय लोंढे पाटील, पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील आणि विज्ञान विभाग प्रमुख आर. एम. पवार, एस बी आटपाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या संपूर्ण विज्ञान मेळाव्याचे नेटके फलक लेखन कलाशिक्षक सतीश नाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शिंदे तृप्ती विलास तर आभार श्री. साळुंखे यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व विज्ञान व गणित शिक्षकांनी विशेष सहकार्य केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!