अल-निनामुळे फलटण शहरात उद्यापासून २०% पाणीकपात; स्विमिंग पूल आणि वाहन वॉशिंग सेंटर्स पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १५ ऑक्टोबर २०२६):-
महाराष्ट्र शासनाने अल-निनामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२६ (प्र.क्र.५०/२०२६)/सिं.व्य. (घो.) दिनांक ०५ ऑक्टोबर २०२६ नुसार मिळालेल्या सूचनेनुसार, फलटण नगर परिषदेच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
या शासन निर्णयाची अंमलबजावणी करत शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पासून फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यामध्ये २० टक्के कपात करण्यात येत आहे. याशिवाय, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शहरातील सर्व स्विमिंग पूल आणि सर्व प्रकारची वाहने धुण्याची वॉशिंग सेंटर्स पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे सख्त निर्देश नगर परिषदेने दिले आहेत.
वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिक व व्यावसायिक धारकांनी या निर्णयाची गांभीर्याने नोंद घ्यावी, पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा आणि या संकटकाळात नगर परिषदेला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!