चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘दांडिया ताल ‘ संपन्न

गरबा, दांडिया मधील विजेत्यांचा सन्मान करताना अभिनेत्री प्राजक्ता घाग व सोबत विश्वस्त श्रद्धा मोकाशी

फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि १८ ऑक्टोबर २०२६):-
कटफळ येथील चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी, येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ‘दांडिया ताल २०२६’ आणि ‘महा भोंडला उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
विद्यार्थ्यांनि पारंपरिक संस्कृती, लोकपरंपरा आणि आधुनिक सांस्कृतिक सादरीकरण केले.
पारंपरिक वेशभूषा, दांडियाचा ताल, गरबा नृत्य आणि भोंडला मध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


या प्रसंगी सद्गुरू श्री वामनराव पै शिक्षण संस्थेचे संस्थापक नानासाहेब मोकाशी, अध्यक्ष संग्रामसिंह मोकाशी, सचिव संगीता मोकाशी, तसेच संस्थेच्या विश्वस्त श्रद्धा मोकाशी व गुलाबी साडी फेम अभिनेत्री प्राजक्ता घाग व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद पवार विभाग प्रमुख डॉ. हेमंत भोसले, सांस्कृतिक विभाग प्रा. सोनल गावडे व शिक्षण ,शिक्षकेतर कर्मचारी ,पालक उपस्तीत होते


‘दांडिया ताल २०२६’ या कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांना प्रसिद्ध रील स्टार प्राजक्ता घात यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचे जतन करणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये एकोपा, सांघिक भावना आणि सांस्कृतिक जाणीव निर्माण करणे हा या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिह मोकाशी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी गरबा, दांडिया मध्ये दाखवलेले यश कौतुकास्पद असल्याचे अभिनेत्री प्राजक्ता घाग यांनी सांगितले.
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले संस्थेच्या विश्वस्त श्रद्धा मोकाशी यांनी आभार मानले



Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!