कर्नाटक ची बदामीदेवी बारामती मध्ये शांकभरी देवी

बारामती मधील शाकंभरी देवी ची मूर्ती (छायाचित्र: सावळेपाटील)

नवरात्र उत्सव मध्ये विविध कार्यक्रम

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ऑक्टोबर २०२६):-
बारामती शहरातील शाकंभरी देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये देवीचे भजन, अभिषेक, श्री सूक्त पाठ , दुर्गा सप्तशती पाठ वाचन,होम हवन आदी कार्यक्रम भाविकांच्या उपस्तीत संपन्न झाले.
बारामती तालुका देवांग व हटगर कोष्टी समाज यांनी ७ गुंठ्यांत पेशव्यांचे सावकार श्रीमंत बाबूजी नाईक वाडया समोर ,सद्गुरू मठ शेजारी १९५० च्या दशकात सदर मंदिराची स्थापना करण्यात आली आहे .


मूळ कर्नाटक राज्यातील बदामी येथील देवीचे स्थान आहे परंतु महाराष्ट्र राज्यात शाकंबरी ,चौंडेश्वरी, बनशंकरी अशा विविध नावाने ती प्रसिद्ध आहे व तिची विविध ठिकाणी मंदिरे आहेत.
जेव्हा सर्वत्र दुष्काळ होता मानवास खाण्यास अन्न नव्हते तेव्हा देवीने स्वतःच्या शरीरातून भाजीपाला व फळे निर्मिती केली आणि लोकांना अन्नपुरवठा केला म्हणून शाकंभरी हे नाव पडले अशी दंतकथा आहे.
सदर देवीची मूर्ती सिंहा वर बसलेली असून हातात विविध आयुधे आहेत.
गाभारा दगडी बांधकाम मध्ये असून इतर कामे सागवानी लाकूड व पत्रा वापरून केला आहे.


कर्नाटक राज्यातील बदामी येथील प्रथेप्रमाणे बारामती मध्ये डिसेंबर व जानेवारी मध्ये देवीचा नवरात्र उत्सव असतो व वसंत पंचमी ला मंदिर स्थापन झाले म्हणून भंडारा असतो व पालखी सोहळा बारामती शहरातून निघतो.
विश्वस्त म्हणून नितीन डोईफोडे, अभिषेक पांडकर,
शरद ढवळशंख, सुरेश टेके, नारायण भंडारी मंदिर समितीचे काम पाहतात.
नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. जे भाविक बदामी कर्नाटक येथे जाऊ शकत नाहीत ते नवरात्र उत्सव व नित्यनेमाने दर्शन करण्यासाठी शाकंभरी मंदिर या ठिकाणी येत असतात.

चौकट:
सध्या मंदिराचे नूतनीकरण करण्याचे असून जिर्णोद्धार साठी ज्या भाविकांनि मदत करावी असे आव्हान शाकंभरी मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले आहे

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!