कन्यापूजनातून स्त्रीशक्तीचा गौरव; मुलींच्या आरोग्याविषयी जागृतीमुधोजी प्राथमिक विद्या मंदिर, फलटण येथे अनंतमाला देवी शारदीय नवरात्रोत्सवाचे प्रथम पुष्प उत्साहात संपन्न

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १८ ऑक्टोबर २०२६):-
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण येथे ‘श्रीमंत अनंतमाला देवी शारदीय नवरात्र उत्सव २०२६–२७’ अंतर्गत प्रथम पुष्पाचे अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी कन्यापूजन करून स्त्रीशक्तीचा गौरव करण्यात आला, तसेच वाढत्या वयातील मुलींचे आरोग्य आणि मानसिक आरोग्य या विषयावर तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन संपन्न झाले.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीच्या चेअरमन मा. सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर लाभल्या होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका मा. सुभद्राराजे नाईक निंबाळकर, मा. डॉ. विक्रांत रसाळ, डॉ. दिव्या रसाळ आणि मा. डॉ. श्रुती थिटे उपस्थित होत्या.

यावेळी प्रमुख पाहुण्या मा. श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर आपल्या भाषणात म्हणाल्या की अशा सामाजिक व आरोग्याभिमुख उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यासोबतच स्त्रीशक्तीचा आदर आणि उत्तम संस्कारांची जपणूक करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश मिळतो असे प्रतिपादन त्यांनी केले.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. विक्रांत रसाळ यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे महत्त्व विशद करत अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले.कार्यक्रम प्रसंगी कन्यापूजनाच्या माध्यमातून मुलींचा विशेष सन्मान करण्यात येऊन त्यांच्यातील आत्मविश्वास उंचावणे आणि स्त्रीशक्तीचा गौरव अधोरेखित करण्यात आला. यासोबतच वाढत्या वयातील मुलींचे आरोग्य, शारीरिक बदल, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यविषयक चांगल्या सवयी यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केल्याने हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी अतिशय बोधप्रद व उपयुक्त ठरला.

या कार्यक्रमाचे नियोजन, मार्गदर्शन आणि प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिताराणी कुमार कुचेकर यांनी केले.

यावेळी उपस्थितांचे स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय श्रीमती जयश्री कदम यांनी करून दिला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. पूनम शिंदे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्रीमती रामेश्वरी जाधव यांनी मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!