फलटणमध्ये ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन; २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये रंगणार बालवैज्ञानिकांचा मेळावा

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि. २३ नोव्हेंबर २०२६): सातारा जिल्हा परिषद, सातारा, पंचायत समिती फलटण (शिक्षण विभाग) आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे विज्ञान प्रदर्शन बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर ते शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे संपन्न होणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि कल्पकतेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, विद्यार्थी व शिक्षकांनी साकारलेली विविध नाविन्यपूर्ण वैज्ञानिक उपकरणे व प्रकल्प याठिकाणी पाहायला मिळणार आहेत.

आयोजक संस्था आणि शिक्षण विभागाच्या वतीने या ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि विज्ञानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालवैज्ञानिकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!