पंढरपूर ते घुमाणं संत नामदेव महाराज सायकल वारी शनिवारी फलटण मुक्कामीमहाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील 160 सायकल रायडर्सचा सहभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते होणार शुभारंभ

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. १७ नोव्हेंबर २०२६):– संत शिरोमणी श्री नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाणं ( पंजाब ) या सुमारे 2500 किलोमीटर सायकल वारीचे उदघाटन राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवार दि 21 नोव्हेंबर रोजी विश्रामगृह, श्री क्षेत्र पंढरपूर येथे करण्यात येणार असून ही वारी सायंकाळी फलटण मुक्कामी पोहोचणार आहे. या वारीत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे 160 सायकल रायडर्सनी सहभाग घेतला असल्याची माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, श्री नामदेव दरबार कमेटी श्री क्षेत्र घुमाणं ( पंजाब ), सायकल रायडर्स असोसिएशन व समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने सन 2022 पासून संत शिरोमणी श्री नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात येते. वारीचे हे पाचवे वर्ष आहे. 21 नोव्हेंबर रोजी निघणारी ही रथयात्रा व सायकल वारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब या पाच राज्यांचा प्रवास करुन 13 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र घुमाणं येथे पोहोचणार आहे. सायकल वारीचा येथे समारोप करण्यात येणार आहे. पुढे हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या चार राज्यातून अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करुन 21 डिसेंबर रोजी ही रथयात्रा श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. या रथयात्रा व सायकल वारीत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे 160 सायकल रायडर्स सहभागी झाले आहेत. हा या वर्षीच्या वारीचा उच्चाॅंक असून सायकल वारीत संत साहित्याचा प्रचार व प्रसार, आरोग्य, पर्यावरण, वृक्षारोपण, प्रदूषण, शिक्षण आदिविषयी प्रबोधन केले जात असल्याचेही भिसे म्हणाले.

या पत्रकार परिषदेस पालखी सोहळा पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष शंकर टेमघरे , उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, सचिव ऍड विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, सदस्य राजेंद्रकृष्ण कापसे, राजेंद्र मारणे, राज्य समन्वयक गणेश उंडाळे, सायकल रायडर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र पिसे आदी उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!