फलटण टुडे वृत्तसेवा (वर्धा दि १९ नोव्हेंबर २०२६):-
वर्धा (महाराष्ट्र) येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये फलटण येथील चॅम्पियन्स कराटे क्लबची खेळाडू कु. अनुष्का अभिजीत कोठारी हिने नेत्रदीपक कामगिरी करत रौप्यपदक पटकावले आहे. अनुष्का ही फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई, फलटण येथील विद्यार्थिनी आहे.

अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत अनुष्काने उत्कृष्ट कौशल्य आणि जिद्दीचे प्रदर्शन घडवत रौप्यपदकावर आपली मोहोर उमटवली. तिला चॅम्पियन्स कराटे क्लबचे संस्थापक शिहान संतोष मोहिते आणि प्रशिक्षक सेन्सई सुरज ढेंबरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अनुष्काच्या या उल्लेखनीय यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई प्रशालेचे प्राचार्य, शिक्षक वृंद, चॅम्पियन्स कराटे क्लबचे पदाधिकारी तसेच क्रीडा प्रेमींकडून तिचे व मार्गदर्शक प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे.


