फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
योग्य मार्गदर्शन आणि परिश्रम याचा एकत्रित परिणाम काय होतो याचे उदाहरण म्हणजे प्रथमेश पेचे या विद्यार्थ्यांने मिळविलेले यश म्हणता येईल. या विद्यार्थ्याला नीट २०२३ च्या परिक्षेत अवघे २०६ गुण मिळाले होते. मात्र नीट २०२४ च्या परीक्षेत त्याला ६२६ गुण मिळाले आहेत. म्हणजेच एक वर्षात घेतलेल्या मेहनतीनंतर ७२० गुणांच्या परीक्षेत तब्बल ४२० गुणांची वाढ झालेली आहे.
प्रथमेश पेचे हा बीडचा राहणारा. त्याने पहिल्यांदा कॉलेज करत असताना ऑनलाईन कोचिंग घेतले आणि त्याधारे २०२३ मध्ये नीटची परीक्षा दिली. या परीक्षेत त्याला ७२० पैकी २०६ गुण मिळाले. मात्र या मिळालेल्या गुणांमध्ये माघार न घेता त्याने आणखी एकदा या परीक्षेसाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. मात्र यावेळी त्याने ऑफलाईन कोचिंगचा पर्याय निवडला. बारामती येथील १७२९ आचार्य अॅकॅडमी येथे त्याने प्रवेश घेतला. वर्षभर बारामती येथेच राहून अभ्यास केला. यानंतर नीट २०२४ च्या परीक्षेत त्याला ६२६ गुण मिळाले आहेत. वर्षभरात नियोजनपूर्वक घेतलेल्या कष्टांमुळे तब्बल ४२० गुणांची वाढ त्याने मिळविलेली आहे. त्यामुळे नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे त्याचे स्वप्न आता पुर्ण होणार आहे.
शिक्षकांसमोर प्रत्यक्ष बसून शिकण्याचा फायदा झाला, आपल्या शंकांचे लगेचच निरसन होऊ शकले. स्वत: नियोजनपूर्वक अभ्यास केल्यामुळे हे शक्य झाल्याचे प्रथमेशचे म्हणणे आहे. त्याने या यशाचे श्रेय १७२९ आचार्य अकॅडमी आणि तेथील शिक्षक यांना दिले.