फलटण टुडे (सातारा,दि.8 ) : –
मांढरदेव ता. वाई येथे श्री काळुबाई मांढरदेवी यात्रा दि.24 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत साजरी होणार आहे. यात्रा कालावधीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधनियम 1951 चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्याहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना 24 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत अधिकार प्रदान केले आहेत. सदरचे अधिकार हे पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून वाहनांच्या नियमासंदर्भात व यात्रेच्या अनुषंगाने व्यक्तींचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.