फलटण टुडे ( चौधरवाडी दि १२ ):-
फलटण तालुक्यतील मौजे चौधरवाडी येथील तालूका स्तरावरती विविध पदावरती काम केलेले जेष्ठ जुने जाणते प्रिसद्ध बागायतदार नाना या नावाने परिचीत असलेले , श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅकेचे माजी संचालक व श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासू निकटवर्तीय कै. गंगाराम श्रीपती भोसले यांचे प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राध्द ) बुधवार दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे .
यावेळी ह.भ.प. युवा किर्तनकार सुरजमहाराज जराड यांचे फुलाचे किर्तन स. १०:३० वा. होईल व त्यानंतर फुलांचा कार्यक्रम दुः१२:०० चौधरवाडी येथे होणार आहे .