फलटण टुडे (नाशिक) :
नाशिक जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशन आयोजित मिनाताई ठाकरे नाशिक विभागीय क्रीडा संकुल , नाशिक या ठिकाणी दि. 4 व 5 आँक्टोंबर 2023 रोजी संपन्न
झालेल्या 37 व्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवडच्या कु. अंकिता सावंत हिने 18 वर्षाखालील गटात 1500 मी. धावणे या प्रकारात रौप्यपदक मिळविले. आणि जोधपूर (गुजरात ) या ठिकाणी दि. 17 ते 19 आँक्टोंबर 2023 रोजी होणाऱ्या पश्चिम भारत विभागीय मैदानी स्पर्धेसाठी पाञता मिळविली. तसेच कु. निशांत सावंत याने 18 वर्षाखालील गटात कास्यंपदक मिळविले. या विजयी खेळाडूंचे जिल्ह्याचे नेते व फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंकेचे चेअरमन व संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फ. ए.सो. क्रीडा समितीचे अध्यक्ष व ग.कौ. सदस्य श्री . शिवाजीराव घोरपडे, फ.ए.सोसायटीचे सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि फ.ए.सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री.अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.एस.टी. कदम , शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शेंडगे टी. एम. , सहाय्यक मार्गदर्शक प्रा.खांडेकर पी. एम. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.