बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
एसटी कामगारांचे थकित वेतन व देय होणारे वेतन दिवाळी पूर्वी देण्यात यावे अशी मागणी एसटी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
कोरोना च्या आपत्ती काळात सोयी-सुविधांचा अभाव असतानाही एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत तसेच सध्या मुंबई बेस्ट प्रवासी वाहतूक एसटी कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत एस टी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी करुणा बाधित झालेले असून सुमारे 74 कर्मचारी मृत्यू झालेले आहेत अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असताना कामगारांना माहे ऑगस्ट 2020 पासून वेतन दिलेले नाही त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे दिवाळी सारखा महत्त्वाचा सण 12 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होत आहे सदर सनापूर्वी एसटी कामगारांना मागील दोन महिन्याचे थकीत व माहे ऑक्टोबर 2020 चे देय वेतन महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळणे आवश्यक आहे तरी या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी
नायब तहसिलदार श्रीमती शिंदे यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी
विभागीय कार्यशाळा बारामती चे अध्यक्ष मनोहर जगताप सचिव राजू भोसले उपाध्यक्ष कल्ली बिरू कार्याध्यक्ष शंकर गेजगे आणि अमरदीप गवळी आदी कामगार प्रतिनिधी उपस्तीत होते.