त्रेमासिक विवरणपत्र ईआर-1 31 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याच आवाहन

                सातारा दि.8 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व  खाजगी आस्थापनांनी  तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक  व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरुष, स्त्री, एकूण ( त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1) सेवायोजन कार्यालयास ऑनलाईन सादर करणे कायद्याने बंधनकारकर आहे.

                त्रेमासिक विवरण पत्र (ईआर-1) दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने https://rojgar.mahaswyam.gov.in  या बेबपोर्टलवर सादर करावे. प्रत्येक नोंदणीकृत आस्थापनेस युजर आयडी, रजिस्ट्रेशन आयडी व पासवर्ड यापूर्वीच दिलेला आहे.  या संदर्भात काही समस्या असल्यास, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय भवन सातारायेथे अथवा कार्यालयाच्या 02162-239938 येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, राजगार व उद्योजकता सातारा यांन कळविले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!