फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पूर/ दरड प्रतिबंधक विकास कामांना चार कोटींचा निधी मंजूर

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण): –

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून १५ व्या वित्त आयोगाने मंजूर केलेल्या राज्य आपत्ती सौम्यी करण निधीमधून राज्यातील आपत्ती सौम्यीकरणा अंतर्गत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पूर/ दरड प्रतिबंधक कामांना चार कोटी (४०० लक्ष)निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागात पुरामुळे नुकसान होऊ नये म्हणून ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधण्यासाठी फलटण-कोरेगाव मतदार संघासाठी आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन अंतर्गत फलटण तालुक्यातील दहा कामांसाठी २६९ लक्ष व उत्तर कोरेगाव मधील सहा कामांसाठी १३१ अशी एकूण ४०० लक्ष (चार कोटी) कामांना दिनांक ३०/९/२०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून सदर कामे लवकरच सुरू होणार आहेत. दरम्यान या कामांमध्ये उत्तर कोरेगाव मधील मौजे दहिगाव बेघरवस्ती ओढालगत संरक्षण भिंत बांधणे २२ लक्ष,मौजे आसनगाव गावाजवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे २४ लक्ष, मौजे घिघेवाडी गावाजवळ गावाजवळ संरक्षण भिंत बांधणे २० लक्ष,मौजे वाघोली बौद्ध वस्ती जवळ संरक्षण भिंत बांधणे २५ लक्ष, मौजे तळीये स्मशानभूमी जवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे २५ लक्ष, मौजे सोळशी स्मशानभूमी जवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे १५ लक्ष, फलटण तालुक्यातील मौजे आळजापूर ओढ्याकाठी संरक्षण भिंत बांधणे ३५ लक्ष, मौजे जावली जालसिद्धनाथ मंदिराजवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे ५० लक्ष, मौजे गोखळी स्मशानभूमी जवळ ओढालगत संरक्षण भिंत बांधणे ३५ लक्ष, मौजे मठाचीवाडी जिल्हा परिषद शाळेमागे ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे २० लक्ष,मौजे निरगुडी गावाजवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे ३४ लक्ष,मौजे तरडगाव स्मशानभूमी जवळ संरक्षण भिंत बांधणे १५ लक्ष, मौजे हनुमंत वाडी झोपडपट्टी येथे ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे २० लक्ष, मौजे आदर्की बुद्रुक स्मशानभूमी जवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे २० लक्ष, मौजे आदर्की बुद्रुक माळवाडी सदन अकोबा निंबाळकर यांच्या शेताजवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे २२ लक्ष, मौजे हिंगणगाव स्मशानभूमी जवळ ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधणे १८ लक्ष, ह्या कामांचा यात समावेश आहे

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!