फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.११):-
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नजिक नांदणी येथे जैन समाजाचा स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ आहे. नांदणी संस्थान मठ येथे पंचकल्याणक महोत्सव उत्साहात व आनंदात संपन्न झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकतिच पंचकल्याणक सोहळ्यास भेट देऊन या क्षेत्राला अ वर्ग दर्जा देण्याचे जाहीर केले. पंचकल्याणक कार्यक्रमात कर्नाटक व महाराष्ट्र मधील बहुसंख्य श्रावक- श्रावीका नी उपस्थित राहुन सोहळ्याचा लाभ घेतला.
फलटण मधील प्रसिद्ध १००८ श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर चे विश्वस्त पदाधिकारी यांनी श्री क्षेत्र नांदणी येथील पंचकल्याणक महोत्सवास भेट दिली. मंदिर समितीचे सचिव श्री.मंगेश शेठ दोशी(गुणवरेकर) खजिनदार श्री.अरिंजय काका शहा, ज्येष्ठ विश्वस्त श्री.उदय काका शहा, विश्वस्त श्री.राजेंद्र कोठारी (बुधकर),तसेच श्री.नंदिश्वर दोशी(गुणवरेकर) यांनी भेट दिली.
श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाच्या वतीने श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर विश्वस्तांचा कार्यक्रम स्थळी ऊचित सत्कार करण्यात आला.श्री जिनसेन भट्टारक स्वामी चें आशीर्वाद पण लाभले.