
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ३१):-
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण येथे 76 वा. प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयामध्ये तिरंगा ध्वज फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य श्री. शिरीष जोशी यांच्या शुभहस्ते फडकविण्यात आला. यावेळी प्रजासत्ताक दिनासाठी मान्यवर म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार श्री. हेमंत रानडे ,प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम ,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.जी. नार्वे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रम देशमुख सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम साजरे करण्यात आले.
