मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रममतदारांच्या सुविधेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष व संपर्क क्रमांकांची घोषणा

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.17 जुलै 2026):-भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सातारा जिल्ह्यामध्ये “विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) – २०२६” राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी BLO यांना EF फॉर्म भरुन द्यावेत या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय सातारा व सर्व ८ विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष मदत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
सर्व नागरिकांना मतदार इन्युमरेशन फॉर्म भरणे, नोंदणी, नाव वगळणे, दुरुस्ती करणे किंवा मतदार ओळखपत्राशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती व साहाय्य सुलभतेने मिळावे याकरिता सर्व ८ विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वतंत्र हेल्पलाईन व संपर्क क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा स्तरावर देखील मदत कक्ष सुरू करण्यात आला असून, नागरिकांसाठी टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मदत कक्ष व संपर्क क्रमांकांचा तपशील खालीलप्रमाणे आहे: २५५ -फलटण तहसिल कार्यालय फलटण ०२१६६-२२२२१०, २५६- वाई मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय वाई, निवडणूक शाखा ०२१६७-२२७७१, २५७- कोरेगाव तहसिल कार्यालय कोरेगाव, निवडणूक शाखा ७०२८५६१४२८, २५८- माण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय माण (दहिवडी) ९१७२२८३३६४, २५९ -कराड उत्तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शाहू चौक, शनिवार पेठ, कराड ०२१६४-२२२२१२, २६० -कराड दक्षिण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शाहू चौक, शनिवार पेठ, कराड ०२१६४-२२२२३५, २६१- पाटण तहसिल कार्यालय पाटण ०२३७२-२८३०२२, २६२ सातारा तहसिल कार्यालय सातारा, निवडणूक शाखा ९८५०८१९८४३, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा जिल्हाधिकारी कार्यालय मदत कक्ष (टोल फ्री क्र.) १९५०
सदर विशेष मदत कक्ष कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहतील. नागरिकांनी आपले EF फॉर्म भरण्यासाठी आपल्या जवळच्या मदत केंद्रात अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!