जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचेमंथन प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश.

यशस्वी विद्यार्थ्यां समवेत मान्यवर व शिक्षक वृंद

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती:प्रतिनिधी,दि १९ जुलै २०२६):-
२०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेत जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विदयालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
यामध्ये विदयालयातून १५० विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. त्यामधून इ.१ली ते इ.४ थी तील एकूण ७ विद्यार्थ्यांना केंद्रस्तरीय शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. यामध्ये इ.१ली मधून चि.वेदांत रविकिरण सुतार (केंद्रात प्रथम), इ.२री मधून चि.अथर्व तुषार बांदल (जिल्हयात चौथा व राज्यात नववा), चि.निहार निलेश वाबळे (केंद्रात प्रथम), चि.प्रभास सत्यजित घाडगे (केंद्रात तृतीय), चि.अधिराज हनुमंत बेलदार (केंद्रात तृतीय), इ.३री मधून चि. ध्रुव विवेक जोशी (केंद्रात तृतीय) व इ.४ थी मधून चि. संस्कार नितीन दळवे (केंद्रात तृतीय) यांचा समावेश होतो.
या सर्व गुणवंत व स्पर्धा परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन प्रमुख पाहुणे व संस्थेच्या मान्यवर संचालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
मुख्याध्यापक अतुल कुटे यांनी या प्रास्ताविक केले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाची स्नातक विद्यार्थिनी कु. पूजा प्रकाश घाडगे (महाराष्ट्र पोलीस) व प्रसिद्ध निवेदक, व्याखायते अनिल सावळेपाटील होते .यश मिळवण्यासाठी प्रत्यनाची पराकाष्ठा करा असे प्रमुख पाहुणे यांनी सांगितले.
बारामती तालुका मंथन प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा समन्वयक मा. सौ. वैशाली धापटे , संस्थेचे सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड उपाध्यक्ष किरण शहा वाडीकर, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष , अविनाश बिराजदार , संचालक धनंजय क्षीरसागर , विद्यालयाची
स्नातक विद्यार्थिनी राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू कु. गौरी बबन सावंत आदी
मान्यवर , पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक , किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (गुरुकुल) हृषीकेश घारे , खजिनदा सतीश धोकटे व सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक अतुल कुटे, बालभवन प्रमुख , निलेश भोंडवे, आणि विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अजिंक्य साळी आभार सोनाली खटके यांनी मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!