बारामतीत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २० जुलै २०२६):- विकासाच्या माध्यमातून बारामतीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच छायाचित्र दालनाचे लोकार्पण गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता करण्यात येणार आहे.

नटराज नाट्य कला मंडळ, तिरंगा सर्कल, बारामती येथे आयोजित या कार्यक्रमास महाराष्ट्राच्या माजी उपमुख्यमंत्री मा. ना. सुनेत्रा वाहिनी पवार, मा. खा. पार्थ पवार आणि मा. जय पवार व पवार कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.

“झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा!” या भावनेतून अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करणारा हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. बारामतीच्या विकासाचा आदर्श निर्माण करणाऱ्या अजितदादांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!