फलटण बाजार समितीत कांद्याचे दर तेजीत; कमाल भाव २,६०० रुपये

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ११ ऑगस्ट २०२६): – कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील मुख्य बाजारात मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. कांद्याला बाजारात चांगली मागणी असल्याने दर तेजीत राहिल्याचे दिसून आले.

बाजार समितीच्या नोंदीनुसार कांद्याला किमान ६०० रुपये, कमाल २,६०० रुपये तर सरासरी १,८०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. या दिवशी बाजारात १,३५३ क्विंटल कांद्याची आवक झाली असून, एकूण २,७०६ पिशव्यांची आवक नोंदविण्यात आली.

कांद्याच्या दरात तेजी राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, आगामी काळात बाजारातील आवक व मागणीनुसार दरात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!