कुटूंबातील प्रत्येक स्त्रीचे आरोग्य महत्वाचे: नगराध्यक्ष सचिन सातव

महिला आरोग्य तपासणी शिबीराचे उदघाटन करताना सचिन सातव व सोबत साधिका बहुउद्देशीय सेवाभावी संस्था च्या महिला

साधिका बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चे वतीने महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि १७ ऑगस्ट २०२६):-
कुटूंबातील सर्वांना उत्तम आहार बनवताना व सर्वांना सुखी,आरोग्यम्य ठेवताना प्रत्येक स्त्री स्वतःच्या आरोग्याकडे कळत नकळत दुर्लक्ष करते व साधारणपणे वयाच्या पन्नाशी नंतर आरोग्याचे समस्या उदभवतात .त्यामुळे घरातील सदस्या प्रमाणेच त्या घरातील प्रत्येक स्त्री चे आरोग्य महत्वाचे असून नियमित आरोग्य तपासणी गरजेची असल्याचे प्रतिपादन बारामती नगरपरिषद चे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी केले.

Screenshot

साधिका बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बारामती हनुमान नगर यांच्या वतीने स्व. अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर चे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे उदघाटन प्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव यांनी मार्गदर्शन केले

या प्रसंगी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष किरण इंगळे, साह्यक कृषी अधिकारी सुप्रिया पवार,नगरसेवक राजेंद्र सोनवणे
नगरसेविका अश्विनी सातव,मा. नगरसेविका डॉ सुहासिनी सातव,
मा, नगरसेवक सुरज सातव, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सातव. साधिका संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना सातव, उपाध्यक्ष हर्षदा सातव,माधवी शेडगे, नीता आवाडे, कविता खाडे, विद्या जाधव सुप्रिया सुर्यवंशी, नंदा जगताप,शितल यादव,, अर्चना पवार,नीता बारवकर पुजा महामुनी करिष्मा आवाडे,व महालॅबचे डॉ व्यंकटेश, डॉ सुनिल पवार, डॉ मनोज खोमने, डॉ महेश जगताप, डॉ नाझीकर,आहार तज्ञ प्रियंका जराड आणि यांनी सहकार्य केले


हनुमान नगर ,माळेगाव कॉलनी , लक्ष्मी नगर परिसरातील महिला, नागरिक उपस्तीत होते.कुटुंबाची काळजी घेणारी घरातील भगिनी ही निरोगी असावी स्वतःहा विषयी जागृत असावी कुटुंबाबरोबर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी व स्त्री ही घराचा पाया असते हाच पाया खचला तर पूर्ण घर कोसळते हे होऊ नये म्हणून महिलांची आरोग्याची तपासणी सलग ४ वर्ष करत असल्याची माहिती साधिका संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना सातव यांनी दिली

थायरॉई,शुगर, हिमोग्लोबिन,बीपी,कोलेस्ट्राॅल,
शुगर तपासणी व विविध आजारानुसार औषध, गोळ्या देऊन तज्ञ महिला डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

Screenshot


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!