मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात दहीहंडी उत्सव उत्साहात; ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ०८ सप्टेंबर २०२६): –
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या प्रांगणात आकर्षक सजावट करून श्री. पाडवी, श्री. वसावे आणि सर्व शिक्षिकांनी दहीहंडी बांधली होती. मुख्याध्यापिका अनिताराणी कुचेकर यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले.

Screenshot


उत्सवासाठी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे रचून ‘गोविंदा आला रे’च्या जल्लोषात दहीहंडी फोडली. या वेळी गाणी, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका अनिताराणी कुचेकर यांनी विद्यार्थ्यांना दहीहंडीचे महत्त्व पटवून देत सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले, तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Screenshot


या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत झाली. कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांना प्रसाद वाटप करून करण्यात आली. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!