किकबॉक्सिंगमध्ये ज्ञानसागरची दमदार कामगिरी!जिल्हास्तरीय स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्यपदकांची कमाई; तिन्ही खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २३ ऑक्टोबर २०२६):-
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित शासकीय जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुल, सावळच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एक सुवर्ण व दोन रौप्यपदकांची कमाई केली. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर तिन्ही खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत संध्या ताकमोगे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवले. तिच्या आत्मविश्वासपूर्ण आणि आक्रमक खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


तसेच सुकृत तुपे याने १७ वर्षे वयोगटातील ७५ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. कृष्णा सूर्यवंशी यानेही १७ वर्षे वयोगटातील ४५ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदकाची कमाई केली.


ज्ञानसागरच्या तिन्ही खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली, ही संस्थेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सागर माणसिंग आटोळे, व्यवस्थापन, प्राचार्य, क्रीडा विभागातील शिक्षक व प्रशिक्षक यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!